गुगलची दिवंगत अभिनेते फारुख शेख यांना आदरांजली

0

आज प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचा ७० वा जन्मदिन आहे. गुगलने त्यानिमित्त डुडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

२५ मार्च १९४८ रोजी गुजरातमधील बडोद्यात फारुख शेख यांचा जन्म झाला. त्यांनी १९७३ मध्ये ‘गर्म हवा’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ते त्यापूर्वी इप्टा या नाट्य संस्थेच्या माध्यमातून काम करत होते. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर, त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. उमराव जान, चश्मेबद्दूर, नूरी, शतरंज के खिलाडी, माया मेमसाब, कथा, बाजार आदी चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. उमराव जानची कथा स्त्री व्यक्तीरेखेवर आधारित होती. पण फारुख शेख यांनी यात साकारलेली नवाब सुल्तानची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.