जिल्ह्यातून सप्तश्रृंगी गडासाठी २०० जादा बसेस

0

जळगाव ;- सप्तश्रृंगी नांदुरीगड यात्रेसाठी जिल्हाभरातील ११ आगारामधून सुमारे २०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याचे नियोजन आगार प्रशासनाने केले आहे. २५ मार्च ते २ एप्रिल असा यात्रेचा कालावधी आहे. यात्रेचा मुख्य दिवस ३१ मार्चला असणार आहे. या दिवशीही गरजेनुसार बसेस वाढवल्या जाणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली .

प्रामुख्याने जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या ठिकाणांवरुन भाविकांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणांवरुन जादा बसेस आहेत. या आगारामधून दिवसाला २० बसेस सोडल्या जाणार आहेत. यासह जामनेर, पाचोरा, यावल, रावेर,मुक्ताईनगर, भुसावळ, एरंडोल येथूनही दररोज सात बसेस असणार आहेत. तसेच गट अथवा ४४ प्रवाशांच्या समुहाने मागणी केल्यास त्यांच्या गावापासून थेट गडापर्यंत बसेस परतीच्या प्रवासासह उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.