ट्रकची दुचाकीला धडक ; तरुण जागीच ठार

0

रावेर येथील घटना ; ट्रकचालक फरार

रावेर- मालाने भरलेल्या अवजड ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो जागीच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी येथील गजबजलेल्या आंबेडकर चौकाजवळ असलेल्या ब·हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर घडली .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी 12.30 च्या सुमारास ब·हाणपूर- अंकलेश्वर राज्य महामार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुढे ब·हाणपूर जिलेबी सेंटरच्या समोर एका अवजड ट्रकने (यु.पी.76 के 8175) ही सावद्याकडे जात असतांना मोहित मुन्नालाल कुशवाह (वय 22) रा. रोकडा हनुमान नगर, हा एम.एच.19 बी.एन.0634  यास ठोस मारल्याने मोटरसायकलवरील चालक चाकाखाली येवून जागीच ठार या बाबत रावेर पोलिसात लखन सिंग कुशवा यांच्या फिर्यादीवरून भाग, 5 गुरू.न. 19/18 भदवी.304अ , 279, 338, एम, व्ही, एकट, 184,134बप्रमाणे फरार ट्रक चालक विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहै . अपघात घडल्यानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.