मोदी आणि शी जिनपिंग यांच्या स्वागतासाठी ‘महाबलीपुरम’ सज्ज

0

चेन्नई – भारत आणि चीनदमध्ये 11 ते 13 ऑक्टोबरमध्ये दुसरी अनौपचारिक शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी भारतात येणार आहेत. तामिनाडूतील महाबलीपुरम या गावामध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. महाबलिपुरम हे एक ऐतिहासिक गाव आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाबलीपुरम गाव मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येत आहे. हे गाव पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र या परिषदेमुळे आणखी जास्त लोकांना आमच्या गावाची माहिती होईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भक्त आमच्याकडे येतील. त्यामुळे या परिषदेचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, अशी माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन जोराने तयारीला लागले आहे. विशेष सुरक्षा व्यवस्थाही लागू केली गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.