वेरुळी खु येथील महिला सरपंचाचे हृदय विकाराच्या तिर्व झटक्याने निधन

0

पाचोरा  (प्रतिनिधी) : शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील यांच्या पत्नी तथा वेरुळी खु” ता. पाचोरा येथील सरपंच मनिषा शरद पाटील वय – 38 यांचे दि. 8 रोजी सकाळी आठवाजेच्या दरम्यान हृदय विकाराचा तिर्व झटका आल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचा रस्त्यातच मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनिषा शरद पाटील ह्या येथील बचतगटाच्या अध्यक्ष होत्या. बचत गटचे पैसे बॅंकेतुन काढुन आणल्यानंतर दि. 6 रोजी त्यांचे घरी 50 हजार रुपयांची धाडसी चोरी झाली होती. त्याचा मनस्थाप येवुन त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. मनिषा पाटील यांचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात चुली पेटल्या नव्हत्या. त्यांचे पाश्र्चात्य पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन त्यांचे मृत्यू प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरद पाटील यांचे घरी राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, दिपकसिंग राजपूत यांनी भेटी दिल्या व कुटुंबाचे सांत्वन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.