मोठी बातमी.. सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

0

बंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एक मोठी बातमी समोर आलीय.  भारताचे सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. दहा जण या हेलिकॉप्टरमध्ये होती अशी माहिती समजली आहे. तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. हेलिकॉ़प्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते असंही सांगण्यात येत आहे.

तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. एकूण दहा प्रवासी होते, लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता अशी माहिती समजते. चार जण अतिगंभीर, तीन गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

लष्कराचं हेलिकॉप्टर कून्नूर इथं क्रॅश झालं आहे. यात जिवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये होते असं म्हटलं जात आहे. हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिपिन रावत यांच्या पत्नीसुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तामिळनाडूच्या कन्नूर येथे बुधवारी लष्कराचे Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हे चॉपर भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि इतर दोन अधिकाऱ्यांना घेऊन जात होते. रावत यांच्यासह एकूण 14 जण यात प्रवास करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सोबतच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच या घटनेची माहिती राज्यसभेत देणार आहेत.

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश होता. त्यातील 11 जणांचे मृतदेह सापडले असून रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्थ झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला.

जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.

हेलिकॉप्टरमधील लोकांची यादी

बिपिन रावत

मधुलिका रावत

ब्रिगेडियर एलएस लिद्दर

लें. क. हरजिंदर सिंह

नायक गुरसेवक सिंह

नायक. जितेंद्र कुमार

ले. नायक विवेक कुमार

ले. नायक बी. साई तेजा

हवलदार सतपाल

Leave A Reply

Your email address will not be published.