राज्यात शेवटच्या आठवड्यात गारठा वाढणार

0

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यभरात आता हवामान मोकळे झाले असून, पुढील दहा दिवस सर्वसाधारण हीच परिस्थिती राहील. नंतर मात्र हवामानात बदल होणार आहे. या बदलानुसार, २० डिसेंबरनंतर उत्तरेकडील पश्चिमी प्रकोप, अति उच्च दाबाचे पट्टे; अशा हवामान बदलाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान मालेगाव येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ डिसेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता सांगितली आहे.

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, पुढील  १०-१५ दिवस पाऊस नाही, ढगाळ वातावरण नाही, थंडीत वाढ होणार, धुक्याचेही प्रमाण कमी असणार आहे. सध्या कोणतीही हवामान प्रणाली कार्यरत नाही. त्यामुळे आकाश निरभ्र राहील. डिसेंबर आणि जानेवारीच्या काही दिवसांत थंडी वाढेल. दक्षिणेकडील राज्यांत हवामान बदल झाल्यास त्याचा राज्यावर काही प्रमाणात का होईना परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.