शिलाई कामगाराची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव येथील एमआयडीसी डी-26 सेक्टरमधील मयुरेश गारमेंटमधील शिलाई मशीन कर्मचारी परवेशकुमार उर्फ पिंटू गौड ( वय 34) याने गळफास घेवून  आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे.

मयुरेश गारमेंट कंपनीत कपडे शिलाई मशीनवर काम करणारा कर्मचारी परवेशकुमार उर्फ पिंटू गौड ( रा- प्रतापगड, उत्तर प्रदेश) गेल्या 1 वर्षापासून काम करत होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत काम करणारे कर्मचारी आले असता आतून कुलूप होते. नंतर कर्मचाऱ्यानी बाजूचे प्लायवूड तोडून बघितले असता कंपनीच्या शिलाई मशीनसमोरील पंख्याखाली परवेशकुमार यांने गळफास घेतल्याचे निदर्शनात आले.

कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या संचालिका कीर्ती वारके यांना फोनद्वारे कळविल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले पोलिसांनी मृतदेह खाली उतरून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. त्याचे नातेवाईक उत्तरप्रदेशमधून निघाले आहे.

आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.  पिंटू गौड यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.