मोटारसायकल घसरल्याने एकाचा मृत्यू

0

पारोळा– प्रतिनिधी

पारोळा-कजगाव रस्त्यावर शिवरे फाट्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाची मोटारसायकल घसरल्याने मृत्यू झाला, याबाबत सविस्तर माहिती अशी की सुभाष शामराव मरसाळे ३२ ( रा मळगाव ता भडगाव) हा आपल्या मोटारसायकल क्र, एम, एच, १९,सि, ई, ४४९२ ने पारोळाहुन भडगाव कडे जात असताना शिवरे फाट्याजवळ त्याची मोटारसायकल घसरल्याने डोक्याला जबर मार लागला त्यास पोलीस काॅंन्सटेबल सुमित राजपुत, ईश्वर पाटील, पोलीस पाटील राजपाल चौधरी, ताराचंद महाजन, रोशन पाटील, व इतरांनी मदत करत १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने डॉ प्रविण पाटील यांच्या कडे दाखल केले असता डाॅक्टरांनी तपास करून त्यास मृत् झाल्या चे घोषित केले, मृत सुभाष मरसाळे यांना त्यानंतर रूग्णावाहीका चालक ईश्वर ठाकुर यांनी पारोळा कुटीर रूग्णालयात दाखल केले, याबाबत रात्री उशिरा पारोळा पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली,

Leave A Reply

Your email address will not be published.