एस एस एम एम महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न

0

पाचोरा ✒ प्रतिनिधी

पाचोरा महाविद्यालयात दि. २५ रोजी विद्यार्थी विकास विभाग युवती सभा या अंतर्गत मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य एन. एन. गायकवाड होते.

उद्घाटक प्रा. डॉ. पवन पाटील प्रमुख उपस्थिती डॉ.जयंतराव पाटील, खलील देशमुख, ग्रीष्मा पाटील डाॕ. अर्चना पाटील, ञिशला लोंढे प्रा. डाॕ शैलजा पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते. विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी महिला, आरोग्य, कायदा यावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थान सुचेता दिलीप वाघ यांनी भूषवले विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना न घाबरता सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करावी असे प्रतिपादन सुचेताताई दिलीप वाघ यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ व प्रा. माणिक पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा. डाॕ. वासुदेव वले, प्रा. जी. व्ही. पाटील प्रा. तडवी प्रा. वळवी प्रा. वानखेडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.