बागड्यांच्या विषयावरून देवेंद्र फडणवीसांनी महिलांचा अपमान केला ; सुळे

0

जळगाव : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. शहरातील मु.जे.महाविद्यालय, बेंडाळे महिला महाविद्यालय येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित कार्यक्रम झाले. यानंतर आज दुपारी खा. सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या  ‘बांगड्या’ वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, पण भाजपनं नाही, अशी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आज जळगावात समाचार घेतला. प्रत्येक महिलेला बांगड्यांचा अभिमान असतो. ज्या बांगड्या सावित्रीबाई फुले यांनी घातल्या आणि शिक्षणाची गंगा आली. ताराराणींनी घातल्या आणि त्या लढल्या. जिजाऊ मातेने घातल्या आणि शिवबा जन्माला आले. परंतु दुर्दैवाने राज्यातील विरोधी पक्षाने त्याच बागड्यांच्या विषयावरून महिलांचा अपमान केला आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.