खुशखबर..सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

सोन्याच्या किंमतीत सतत घसरण सुरूच आहे तर चांदीचा दरही किंचित कमी झाला आहे. तुम्हीपण सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून शुक्रवार 23 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 800 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मौल्यवान धातू सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच असताना शुक्रवारी धातूच्या दरातही घसरण झाली तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर आठवडाभरातील नीचांकी पातळीवर कमी झाला आहे.

देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याची किंमत सुमारे 200 रुपयांनी कमी झाली आणि 71,466 रुपयांवर व्यवहार करत होता जो गुरुवार 71,577 रुपयांवर बंद झाला. सोन्याचा सध्याचा भाव पाहून महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, मात्र अजूनही सर्वसामान्यांना 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71 हजारांच्या पुढे पोहचला आहे. तसेच अलीकडेच काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर 74 हजारांवर पोहोचला होता तर चांदीने 89,697 रुपयांवर उडी घेतली होती. म्हणजे शुक्रवारी, सोन्याबरोबर चांदीच्या दरातही पडझड झाली आहे.

सोने-चांदीचे दर किती कमी झाले
चालू संपूर्ण आठवड्यात MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचा भाव 74,300 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून 2,800 रुपयांनी घसरला आहे. मात्र, शुक्रवारी चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. वायदे बाजारात चांदी 400 रुपयांहून अधिकने महागले आणि 90,888 रुपयांवर व्यवहार करत होती जी शेवटच्या व्यवहारात 90,437 रुपयांवर स्थिरावली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यासह सह अनेक घटकांवर सोने-चांदीची किंमती अवलंबून असतात. तसेच मौल्यवान धातूच्या दरांमध्ये दिसणारा ट्रेंड ठरवण्यात जागतिक मागणीही महत्त्वाची भूमिका बजावते.

असे आहेत सोन्याचे दर
मुंबई – 66,400 रुपये
पुणे – 66,400 रुपय
नागपूर – 66,400 रुपये
कोल्हापूर – 66,400 रुपये
जळगाव – 66,400 रुपये
ठाणे – 66,400 रुपये

असे आहेत चांदीचे दर
मुंबई -92,000 रुपये
पुणे – 92,000 रुपये
नागपूर – 92,000 रुपयेे
कोल्हापूर – 92,000 रुपये
जळगाव – 92,000 रुपये
ठाणे – 92,000 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.