”मै भी चौकीदार” म्हणत पंतप्रधान मोदींची प्रचार मोहिमेला सुरुवात

0

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ”मै भी चौकीदार” या हॅशटॅगसह एक व्हिडिओ टि्वट करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतर्गंत ते ३१ मार्च रोजी देशभरातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

पंतप्रधान मोदींनीही त्याच आशयाचे टि्वट केले आहे. तुमचा चौकीदार ठाम असून देशाची सेवा बजावत आहे. पण मी एकटा नसून जे कोणी भ्रष्टाचार, समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देत आहेत ते सुद्धा चौकीदार आहेत. देशाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम करणारे प्रत्येकजण चौकीदार आहे. आज, प्रत्येक भारतीय म्हणत आहे ”मै भी चौकीदार” असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.