बहुजन वंचित आघाडीतर्फे जळगाव व रावेर मतरदारसंघातून यांना मिळाली उमेदवारी

0

जळगाव: लोकसभा निवडणुकीसाठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीतर्फे शुक्रवारी पहिली ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये जळगाव मतदार संघातून अंजली रत्नाकर बाविस्कर (शिंपी), रावेरमधून नितीन प्रल्हाद कांडेलकर (कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर) यांना उमेदवारी जाहीर झाली.

जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलेल्या अंजली बाविस्कर १९९५ पासून समाजसेवा तसेच आरोग्य, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करीत आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघातून नितीन प्रल्हाद कांडेलकर यांचा मूळ शेती व्यवसाय आहे. कांडेलकर यांचे आजोबा तुकाराम कांडेलकर हे १२ वर्ष पंचायत समितीचे उपसभापती व १० वर्ष बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच मुक्ताईनगर शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या आई जानकीबाई कांडेलकर या कुऱ्हा जि.प.गटातून जिल्हा परिषद सदस्या होत्या. २०१७ मध्ये त्यांनी स्वत: मुक्ताईनगर-निमखेडी गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढविली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.