मे महिन्याच्या मध्यापर्यंत होणार कोरोनाचा उद्रेक?

0

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या तेजीनं वाढत आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत कोरोनाचा पीक असेल असं केंद्र सरकारला सांगण्यात आलं होतं.

परंतु यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक असेल असं सांगण्यात आलं, अशी माहिती आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक आणि कोविड-१९ सुपरमॉडेल समितीचे प्रमुख डॉ.एम. विद्यासागर यांनी दिली. “१३ मार्चपर्यंत कोरोनाच्या प्रकरणांचा आलेख वर जात होता हे कोणीही पाहू शकेल. परंतु तेव्हा आमच्याकडे इतका डेटाही नव्हता की आम्ही कोणती भविष्यवाणी करू शकू,” असं ते म्हणाले.

२ एप्रिल रोजी अधिकृतरित्या १५ ते २२ मे दरम्यान दररोज १.२ लाख नवे रुग्ण दररोज सापडू शकतात असं सांगण्यात आलं होतं. परंतु भारतात यापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात दररोज ३.५ लाखांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ८ मे पर्यंत पीक वर जाऊ शकते, असं सांगण्यात आलं होतंय यामध्ये १४ ते १८ मे दरम्यान देशात अॅक्टिव्ह केसेस ३८ ते ४४ लाखांच्या दरम्यान असू शकतात असंही म्हटलं होतं. “केंद्र सरकारनं दीर्घकालिन किंवा मध्यम कालावधीच्या योजनांव्यतिरिक्त अल्पकालिन योजनांवर लक्ष केंद्रीत केलं. परंतु गेल्या काही घटनांवर लक्ष दिलं तर ही पावलं यशस्वी ठरली नसल्याचंच दिसून येतं,” असं विद्यासागर म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.