फ्लिपकार्ट सेल; मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट

0

मुंबई : मोटोरोलाने त्यांच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसाठी  आहे, हा सेल 2 मेपासून सुरू झाला आहे. हा ऑनलाईन सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी ग्राहकांना मोटोच्या टॉप स्मार्टफोन्सवर बम्पर सूट मिळू शकते. या यादीमध्ये मोटो जी 40 फ्यूजन आणि मोटो जी 60 या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. विक्री दरम्यान, ग्राहकांना त्वरित 10 टक्के सूट देखील मिळेल. त्याच वेळी, एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर सूट मिळेल.

मोटोरोलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनला उत्कृष्ट फीचर्ससह अपग्रेड करायला हवं. यात कॅमेरा सिस्टम, वेगवान प्रोसेसर, लाँग बॅटरी, स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव आणि अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. या सर्व फीचर्ससह, ग्राहक सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन निवडू शकतात. अशा परिस्थितीत फ्लिपकार्ट सेलदरम्यान दिल्या जाणाऱ्या बेस्ट डील्स ग्राहकांनी मिस करु नये.

Razr 5G फोल्डेबल फोनवर 21 हजारांचा डिस्काऊंट

ग्राहक या सेलमध्ये फोल्डेबल फोन देखील स्वस्तात खरेदी करु शकतात. जो मोटो रेजर 5 जी या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये हा फोन 88,999 रुपये इतक्या किंमतीसह उपलब्ध आहे. आपण हा स्मार्टफोन एचडीएफसी बँक ऑफरसह खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 1,09,999 रुपये आहे. त्याच वेळी, या फोनचं बेस मॉडेल 53,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची किंमत 74,999 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे.

G10 Power, E7 Power वर मोठा डिस्काऊंट

मोटोरोलाच्या म्हणण्यानुसार तुम्ही मोटो जी 10 पॉवर हा स्मार्टफोन 8099 रुपयात खरेदी करू शकता. त्याच वेळी, मोटो ई 7 पॉवर 6299 रुपयांमध्ये बँक ऑफरसह खरेदी करता येईल. मोटो जी 60 हा स्मार्टफोन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पण ही ऑफर ग्राहक जेव्हा एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहाराच्या सहाय्याने फोन खरेदी करतील तेव्हाच उपलब्ध असेल. तर जी 40 फ्यूजन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो, म्हणजेच 12,999 रुपये या किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

रियलमी, सॅसमंगच्या स्मार्टफोन्सवर सूट

फ्लिपकार्टच्या लेटेस्ट ऑनलाइन सेलमध्ये इतर स्मार्टफोन ब्रँडवरही बर्‍याच ऑफर्स मिळतील. म्हणजेच, आपण रियलमी नार्झो 30 ए हा स्मार्टफोन 7,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्याच वेळी, सॅमसंग गॅलेक्सी F62 ची प्रारंभिक किंमत 17,999 रुपये इतकी आहे. तर रियलमी C25 आणि रियलमी C21 9,499 आणि 7249 रुपयांच्या या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. सेलमध्ये आपण डिजिटल कॅमेरे, वायरलेस इअरबड्स आणि स्मार्टवॉचदेखील खरेदी करू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.