मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक आरक्षण लागु करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज वंचित बहुजन आघाडीच्या वतिने 5% मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरीता  तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण सरकार लागु करत नाही आहे. ते तत्काळ लागु करण्याकरीता वंचित बहुजन आघाडीने 5 जुलै 2021रोजी विधान भवनावर मोर्चा काढला होता व मुख्यमंत्री मुख्यमंत्री  ठाकरे यांच्या पर्यत निवेदन पोहचविण्यात आले  होते. पण आता पर्यत त्या आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नाही आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करण्यात आले, या पाश्वभूमीवर  मुक्ताईनगर येथील तहसीलदारांना मागणीपर निवेदन देण्यात आले.

निवेदनातील मागण्या  

१) न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तत्काळ लागु करण्यात यावे.

२) धार्मिक भावना भडकावुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना  कठोर शिक्षा देणारे मोहम्मद पैगंबर बिल वंचित बहुजन आघाडीने सुपुर्त केले आहे, ते बिल येणाऱ्या  हिवाळी अधिवेशनात मंजुर करून तत्काळ तो कायदा लागु करावा.

३) महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम, मुअज्जिन आणि  खुद्दाम हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.

४) संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या  हभप किर्तनकार यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.

५) वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून  त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या  ऊन्नतीसाठी ऊपयोग करावा.

६) सारथी, बार्टी, महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी जेणेकरून मुस्लिम अल्पसंख्याक समाज सुध्दा मुख्य प्रवाहात येईल अशा विविध मागण्याकरीता आज वंचितने निवेदन देले.

निवेदन देतांना ता महासचिव डी. डी. पोहेकर, ता कोषाध्यक्ष वसंत लहासे, गोपाळ धुंदले, ता संघटक माणिकराव इंगळे, सुनिल धुरंधर, कमलाकर तायडे, साबिर खान अब्बास खान , जेष्ठ नेते एस. टी. हिरोळे, कमलाकर तायडे, मिलिंद  वाघ, शंकर इंगळे, सादिल खॉ अब्बास खॉ, गणेश सोनवणे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन मा राज्य सदस्य शुभम आसलकर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.