मुलींनी सोशल मिडियाचा योग्यरित्या वापर करावा – गजानन राठोड

0

भुसावळ (प्रतिनिधी)- महाविद्यालयातील विद्यार्थिनीं व मुलींनी स्वसंरक्षणा बरोबरच स्वावलंबी बनावे . सध्याच्या काळ सोशल मिडीयाचा जास्त वापर वाढत  आहे.सोशल नेटवर्किंग मध्ये जाणीवपूर्वक काळजी घ्यावी,योग्यरित्या वापर करावा  त्याचा वापर कसा करायचा  पोलीसांचा प्रतिसाद अॅप, फेसबुक, व्हॉटसअप चावापर करतांना कोणती काळजी घेतली पाहिजे , मुलींनी आपण ज्या भागात राहतो त्या भागातील पोलीस स्टेशनचा नंबर आपल्या मोबाईल मध्ये जतनकरु ठेवावा.तसेच आपल्यावर काही प्रसंग ओढवल्यास तात्काळ आपण पोलीसांशी संपर्क करावा आदीबाबत महत्वपूर्ण माहीती उपविभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड यांनी दिली .

महिलांचा संरक्षणासाठी पोलीस विभाग व पिंकेथॉन यांचे संयुक्त विद्यमानाने स्वयंसिध्दा हा कॉलेजच्यामुलींसाठी स्वसंरक्षणार्थ कार्यक्रम उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,यांचे अध्यक्षते खाली  नाहाटा कॉलेज येथे गुरुवार १९ डिसेंबर रोजी सकाळी ११वाजता  कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राठोड यांनी विद्यार्थिनीसोबत संवाद साधला .

या कार्यक्रमात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  दिलीप भागवत नाहाटा कॉलेजचे प्राचार्य श्रीमती वायकोळे , पिंकोथॉन अॅबेसेडर सौ.माधरी गजर,  सक्षम सेवा फाऊंडेशनचे अध्यक्षा सौ.आरती चौधरी तसेच कॉलेजचे शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सारीका खैरनार, महिला पो.कॉ.विजया सपकाळे (निर्भया पथक) यांनी महिलांच्या कायदे विषयक,प्रतिसाद अॅप व महीलांनी आपले संरक्षण कसे करावे त्या बाबत माहिती दिली.तर मुलींनी शिक्षणाच्या बाबतीत मागे न राहता शिक्षण घेवून आपल्या पायावर उभे राहावे , स्वावलंबी व्हावे यावर नाहाटा कॉलेजचे प्राचार्य डॉ सौ  मीनाक्षी  वायकोळे  यांनी मार्गदर्शन करीत असे कार्यक्रम नियमित घेण्यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करावे असे आवाहन केले.

पिंकेथॉन अँबेसेडार सौ.माधुरी गुजर- यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.व महीलांचे आरोग्य बाबत माहीती देवुन महीलांनी कसे संरक्षण करावे यावर प्रकाशझोत टाकला. सक्षम सेवा फांऊडेशन सौ.आरती चौधरी यांनी विद्यार्थीना रात्री बेरात्री फिरत असतांना त्यांनी दक्षता घ्यावी.हे असे स्वंयसिद्धा कार्यक्रम वेळोवेळी घेण्यात यावे.तसेच महीलांचे समस्या व निराकरण यावर उपस्थितांशी हितगुज केले.

नाहाटा कॉलेजचे चेअरमनमोहन फालक यांनी महिला मुलींनी आपण एकटे राहतांना काळजी घ्यावी.तसेच कोणावर वा घरच्यांवर एखादा  अतिप्रसंग ओढवल्यास तात्काळपोलीसांची मदत घ्यावी असे  सांगीतले. कार्यक्रमा दरम्यान कॉलेजच्या 300 ते 400 विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.