अट्टल दरोडेखोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

0

जळगाव :  दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मुसक्या आवळल्या. साबीर उर्फ मोनू युसूफ मुसलमान (वय ३०, रा. मुंडी, ता.पुनासा, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने बालपणापासून मध्य प्रदेश, महाराष्ट्रात अनेक चोऱ्या केल्या आहे. दरम्यान, आठ वर्षांपूर्वी पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यात तो संशयित होता.

साबीर याने साथीदारांच्या मदतीने ८ जून २०१२ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर विचखेडे गावाजवळ ट्रक (एमएच- ०५, के- ८८१४) अडवून चालक व क्लिनर यांना मारहाण केली होती. तसेच पिस्तूलातून गोळीबार करून चालकाच्या खिशातील २६ हजार ८५० रुपये हिसकावले होते. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेंव्हापासून दरोडेखोरांची ही गँग बेपत्ता होती. दरम्यान, साबीर हा बालपणापासूनच दरोडे टाकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच पारोळा येथील दरोड्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, अशोक महाजन, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, इद्रिस पठाण, प्रकाश महाजन, गफूर तडवी, वैशाली महाजन यांच्या पथकाने साबीर याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने मुंडी शहरात दोन ठिकाणी सापळा रचला होता. मध्य प्रदेशातील दरोड्याच्या गुन्ह्यात साबीर याला १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.