मुजे विद्यालयात सायबर सुरक्षा अभियान

0

जळगाव –
मूळजी जेठा महाविद्यालय, रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुना कॉन्फरन्स हॉल येथे दि 4 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने एन सी सी महाविद्याल युनिट साठी सायबर सुरक्षा अभियान अंतर्गत छात्रसैनिकांसाठी व्याख्यान घेण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंगात नेमाने यांचे व्याख्यान झालेत.
श्री बेंद्रे यांनी आपल्या व्याख्यांत सांगितले की, विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेतील मोठी अडसर म्हणजे सायबर ची अभेद्य सुरक्षा. तरुणांकडून नकळतपणे सोशल मिडीयावर गुन्हे होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे थांबण्यासाठी युवकांमध्ये जागृती आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
पीएसआय अंगत यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की, व्हाटस अप, फेसबुक यांच्यावर मोठ्याप्रमानत शेअर होणारे इमेजेस, क्लिप्स, माहिती द्वारे सामाजिक, धार्मिक आणि सांकृतिक भावना दुखावल्या जात आहेत. फिशिंग द्वारे आर्थिक धोकाधडी होत आहेत. यासाठी नागरीकांमध्ये जागृतीची कामे युवकांनी करावेत असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कलाशाखेचे उप प्राचार्य डॉ. सुरेश तायडे होते. यांनी आपल्या मनोगतात सांगिले की, महाराष्ट्र पोलीस अहोरात्र अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेमुळे आजचा युवक मोठ्या धोक्यांपासून वाचत असतो. यासाठी महाराष्ट्र पोलिसांची विशेष आभार मानलेत.
कार्यक्रमाचे संयोजन लेफ्ट डॉ योगेश बोरसे यांनी केले होते. आभार मानलेत लेफ्ट डॉ एन सी राठोड यांनी मानलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.