गरुड महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पाडसाचे वाचवले प्राण

0

हरणाचे पिलू वनअधिकार्‍यांच्या स्वाधीन : पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले उपचार

शेंदुर्णी –
अ. र. भा. गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या गोंदेगाव येथे आयोजित विशेष हिवाळी शिबिरातील दिपक नाईक व रवींद्र पांडव या स्वयंसेवकांना सकाळी फिरत असताना हरिणीचे पाडस दिसले. काही कुत्र्यांनी त्या पिलाला चावा घेतला. दोघा स्वयंसेवकांनी कुत्र्यांपासून हरिणाच्या पिलाची सुटका करून शेंदूर्णीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला. काही वेळाने पिलू शुद्धीवर आले. पोलीस स्टेशन मध्ये नोंद करुन वनविभागाच्या अधिकार्‍यांकडे या पाडसाला स्वाधीन करण्यात आले. एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवल्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. आर.डी. गवारे, प्रा. प्रमोद सोनवणे, डॉ. दिनेश पाटील, डॉ. योगिता चौधरी, प्रा. आप्पा महाजन, प्रा. निरुपमा वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.