मुंबईत आणखी सापडला करोनाचा रुग्ण, राज्यात एकूण १८ कोरोनाग्रस्त

0

मुंबई | शहरात आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ झाली असून, राज्यातील हा आकडा १८ वर पोहोचला. करोनाबाधित रुग्ण हा घाटकोपर पूर्वेकडील पेट्रोल पंपावरील कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यात करोनाचा धोका वाढला आहे. या विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १८वर पोहोचली आहे. दहा रुग्ण हे पुण्यातील आहेत. तर नागपुरात तीन रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत हा आकडा चारवर पोहोचला आहे. घाटकोपरमधील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यात करोनाचा फैलाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्य-सिनेमागृहे आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.