भुसावळात बारा गाड्यांचा जल्लोष

0

भुसावळ | प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही रंगपंचमीला शहरातील बाजारपेठेत असलेल्या मरीमाता देवीच्या बारागाड्या आज १३ शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या.
येथील गंगाराम प्लॉट भागातील जुन्या पोस्ट ऑफिस जवळून सायंकाळी ६ वाजता बारा गाड्या ओढण्यात सुरुवात झाली बारागाड्या जवाहर डेअरी मार्गे बाजारातील गणेश मेडिकल पर्यंत ओढण्यात आल्या .बारागाड्या बघण्याकरीता व मरिमाता देवीचे दर्शनाकरीता परिसरातील भाविकांसह नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती . स्व शंकर चिमण पाटील यांच्या आशिवार्दाने सालाबादा प्रमाणे मरीमाता बारागाड्या ओढण्यात आल्या भगत दत्तु सुरेश महाजन व बगले रीतेष शरद महाजन निलेश सदाशिव पाटील यांनी बारागाड्या ओढल्या. यशस्वीतेसाठी गब्बर पाटील नितीन धांडे, किरण महाजन, सुनिल नेवे सर ,अशोक चौधरी, किशोर कोलते ,भानुदासा पाटिल, सुभाष पाटील ,प्रशांत नरवाडे, सुरेश जावळे, नितीन नाले, निलेश कोलते ,निलेश कोळी ,बोरोले, बाबुभाई सोलंकी ,संतोष कोलते, अभय फालक, दिपा ढाके, रवि पाटील, नरहरी पाटील, मधु ढाके बापु पाटील, राजु भंगाळे , प्रदिप मुंडे ,हर्षल वारके ,यतिन पाटिल, मयुर चौधरी ,निलेश लोखंडे, सुधाकर लोखंडे ,शुभम पाटील, लोकेश नाले ,अक्षय खडसे ,गोकुळ पाटील ,बंडू पाटील ,गिरीष भिरूड , निरज बनाईत, राहुल पाटील, जयश ढाके ,मधु पाटील, मनोज कोलते, गिरीश पाटिल ,सुमित पाचपांडे ,गोलु वायकोळे, स्वप्निल भारंबे, सुमित देवकर, गोलुु ठाकुर चंदण धोबी, भुषण भंगाळे गोलु चौधरी वासु वराडे ,किरण पाटील किशोर कोलते ,विलास पगारे, विशाल भंगाळे, मित्र मंडळ, मातृभूमी मंडळ श्रीराम मंडळ सर्वोदय मंडळ ,आनंद मंडळ, अष्टभुजा मंडळ शिवराय मंडळ नमस्कार मंडळ ,भद्रकाली मंडळ साधना मंडळ, सत्कार मंडळ, भवानी पेठ मंडळ यांनी परीश्रम घेतले . प्रसंगी बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.