मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी; तीन महिन्यातील सर्वांत कमी रुग्णांची झाली नोंद

0

मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे. मात्र, असे असले तरी कोरोना संकटात मुंबईला दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. मुंबईत एका दिवसात सर्वाधिक नऊ हजाराच्या जवळ चाचण्या करण्यात आल्या असताना फक्त ७०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या १०० दिवसात आढळलेली ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे. सोमवारी मुंबईत एकूण ८७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामधील ७०० नमुने पॉझिटिव्ह आढळले.

तत्पूर्वी रविवारी मुंबईमध्ये कोरोनाचे १ हजार ३३ रुग्ण सापडले होते. दरम्यान, आता मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता वाढून ६८ दिवसांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट हा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच २० ते २६ जुलै या आठवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांचा ग्रोथ केवळ १.०३ एवढाच राहिला आहे.

दरम्यान, सोमवारी संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या ७ हजार ९२४ रुग्णांची नोंद झाली होती. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ हजार १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाचे एक लाख १० हजार १८२ रुग्ण सापडले असून, आता केवळ २१ हजार ८१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ३४ हजार ४७१ आणि पुण्यामध्ये ४८ हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.