ऐतिहासिक दगडी दरवाजाचे लवकरच रूप पालटणार

0

अमळनेर (प्रतिनिधी):-अमळनेर शहराच्या ऐतिहासिक वारसा असलेला दगडी दरवाजा मागील काळात खूप दुर्लक्षित होत होता, त्याची खूप मोठ्या प्रमाणात क्षती देखील झालेली आहे, ऐन पावसाळ्याच्या आधी दगडी दरवाज्याचा एका बाजुचा बुरुज ढासळला होता.या वास्तुचे संगोपन व जतनाची जबाबदारी नगरपरिषदेस मिळावी यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद दगडी दरवाजाच्या संवर्धनासाठी वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत होती.

त्यानुसार राज्य संरक्षित स्मारक योजने अंतर्गत संगोपनार्थ देण्याबाबतच्या करार नाम्यावर लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील ,विरोधी पक्ष गटनेते प्रविण पाठक, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्या स्वाक्षरी करून वास्तु विशारद चेतन सोनार,चेतनभाई शहा यांच्या मार्फत मा.संचालक,पुरातत्व व वस्तु संग्रहालय, संचालनालय मुंबई सुपुर्द करण्यात आला यावेळी नगरसेवक प्रा.रामकृष्ण पाटील,श्याम पाटील,बाबु साळुंखे, विक्रांत पाटील,नगर अभियंता संजय पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, हरीश पाटील,मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.