मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कीर्तनकार इंदुरीकर महाराज  हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. नाशिकमध्ये  इंदुरीकर महाराजांचे झालेल्या कीर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आहे. या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणावर  भाष्य केलं आहे. तसेच आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात म्हणतात, प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करणार….

कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. एकीकडे संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असतानाच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे सार्वजनिकपणे नागरिकांना सांगत आहेत. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंदुरीकर महाराज कीर्तनामुळे अडचणीत काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.