मालेगावजवळ जळगाव पोलिसांच्या वाहनास अपघात; २ कर्मचारी जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव पोलिसांच्या शासकीय वाहनाचा  मालेगावजवळ  अपघात झाल्याने  दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

जळगाव पोलिसांच्या वाहनास  मुंबई-आग्रा महामार्गावरील पोलिस चौकीजवळ  कंटेनरने धडक दिल्याने दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला. बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे शासकीय सुमो वाहनाने (क्रमांक- एमएच १९ एम ०७४१) मालेगावहून जळगावला परतत असतांना हा अपघात घडला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या अपघातात बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे दोघे कर्मचारी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.