माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंसह आठ जणांवर गुन्हा दाखल

0

भुसावळ दि. 1 –
डेली बाजार भुसावळ सायकल स्टॅण्ड वसुलीत 22 लाख 40 हजाराचा अपहार केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह माजी नगरसेविका कविता चौधरी, शारदा झोपे, शोभा सपकाळे,सुशीला अहिरे, जलील कुरेशी यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी, बी.टी.बाविस्कर,अनिल जगताप व कंत्राटदार विकास पाटील यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात निवृत्त नगरपरिषद कर्मचारी सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.
आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग झाल्याने बुधवारी सकाळी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्याचे तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी सांगितले.उमेश नेमाडे यांच्या काळात 27 मे 2013 ते 31 मार्च 2014 या काळात बाजार मक्ता व सायकल स्टॅन्ड वसुलीत अपहार झाल्याचा आरोप आहे.तक्रारदार पाटील यांनी आर्थिक फसवणुकीबाबत 7 गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतही लवकरच दोषारोप पत्र दाखल केले जाईल असे त्यांनी सांगितले.अपहार प्रकरणी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.