महासभेला अंधारात ठेवून पाठविलेल्या प्रस्तावांची माहिती द्या;

0

उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांचे नगररचना विभागाला आदेश

जळगाव दि. 1-
महासभेची मंजूरी न घेता भूसंपादनाचे प्रस्ताव महासभेला अंधारात ठेवून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविल्याप्रकरणी महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी नगररचना विभागाची हजेरी घेत सदर प्रस्तावांची माहिती मागितली आहे.
मनपाच्या मंजूर विकास योजनांमधील आरक्षणाच्या जागांच्या कोट्यवधी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव नगररचना विभागाने महासभेची परवानगी न घेताच जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले असून गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन यांनी केला होता. याप्रकरणी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी नगररचना विभागाला सदर 10 प्रस्तावांपैकी 9 प्रस्तावांची माहिती त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहे. यातील पहिल्या प्रस्तावाला महासभेची मंजूरी असल्याचे समजते. तर उर्वरित 9 प्रस्तावांबाबत उपमहापौरांनी भूखंडाचे स्थान, आकारमान, जमीनमालक त्याचप्रमाणे सदर भूखंडाच्या संपादनासाठी ठरवलेली रक्कम याची विस्तृत माहिती ताबडतोब सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.