सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांचे नदीतच बसून उपोषण

0

हिंगोणे वाळू तस्करी प्रकरण आरोपींवर मोका कायदा अर्तंगत कारवाईची मागणी

चाळीसगाव :-
चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे वाळू तस्करी प्रकरणी, पोलीसांनी व महसूल प्रशासनाने थातूरमातूर कारवाई करून आरोपींना अभय दिले,अशा संताप व्यक्त करुन हिंगोणे येथील सरपंच उपसरपंच सह ग्रामस्थांनी तितूर नदी पात्राजवळील ग्राम ओट्यावर आज पासून उपोषणाला सुरुवात केली आहे,या उपोषण करत्यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय संपत्तीचे राजरोसपणे तस्करी करणार्‍या आरोपींवर मोका कायदा अर्तंगत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे, यावेळी उपोषण स्थळी हिंगोणे येथील सरपंच मिनाबाई ज्ञानेश्वर महाजन, उपसरपंच रेखाबाई रविंद्र पाटील, सदस्य भारती संजय सूतार,भारती कैलास महाजन, अनिता भाऊसाहेब गायकवाड, सुनील जालम कोष्टी, हिरामण सोमा बावीस्कर, अरविंद भिमराव चव्हाण, तसेच विविध विकास संस्था चे चेअरमन सयाजी बळीराम पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, बाळासाहेब पाटील,ज्ञानेश्वर एकनाथ महाजन, शांताराम आत्माराम पाटील, दिपक विनायक पाटील, गुलाब चिंधा पाटील, आदी मान्यवर बसले होते.
** पोलीस व महसूल प्रशासन राजकीय दबावाखाली करतंय काम,
ग्रामस्थांच्या संतप्त आक्रोश,
शहरातील पत्रकारांच्या टीमने हिंगोणे येथे उपोषणाला बसलेल्या सरपंच उपसरपंच सह ग्रामस्थाच्या उपोषण स्थळाला भेट दिली असता त्यांच्या भावना अतिशय संतप्त झालेल्या होत्या त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन हे राजकीय दबावाखाली काम करतंय , कोट्यावधी रुपयांची वाळूची अवैध तस्करी केली असतांना थातुरमातुर पंचनामा करून, पंचवीस हजार रुपये किंमतीची वाळू चोरी प्रकरणी महसूल प्रशासनाने गुन्हा नोंदविण्यात आला, पोलीस प्रशासनाने सुध्दा आरोपींना मदत होईल अशा प्रकारे कर्तव्य पार पाडले, साधं सायकल चोर , किंवा घरफोडी मध्ये पोलीस,7, दिवस,15 दिवसांची पी.सी.मागते मग कोट्यावधी रुपयांची वाळूची अवैध चोरी प्रकरणी ,गेल्या वर्षभरात तितुर नदीतून लाखो ब्रास वाळू तस्करी केली, वाळू कोणत्या बिल्डर, किंवा कंपनीला दिली याचा तपास कोण करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
* महसूल प्रशासन खडबडून जागे, पुन्हा पंचनामा चे आदेश,*
हिंगोणे येथील तितूर नदी पात्रातील वाळू तस्करी प्रकरणी मंत्रालयात राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसूलमंत्री व महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर महसूल प्रशासन जागे झाले व त्यांनी लगेचच हिंगोणे चे तलाठी प्रविण महाजन यांनी केलेला थातुरमातुर पंचनामा नंतर पुन्हा किती प्रमाणात वाळूची अवैध चोरी झाली त्याचे माजमाप करण्यात आले.आधी च्या पंचनाम्यात आणि नंतरच्या पंचनाम्यात फारच तफावत येत आहे.या प्रकरणाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.