महेश मांजरेकरांवर ‘ही’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकतीच पार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. या यादीमध्ये आता लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे नाव जोडले गेले आहे. नुकतीच महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. महेश मांजरेकर ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त असून त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यात सांगितले होते. त्यामुळे आता महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते पुन्हा घरी परले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईच्या एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये १० दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. आता दिग्दर्शक महेश मांजरेकर घरी परतले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

महेश मांजरेकर यांचे नाव चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. मराठीसह त्यांनी हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीत काम केले आहे. सर्वात पहिल्यांदा महेश मांजरेकर दूरदर्शनवरील एक मराठी सीरिज ‘क्षितीज’मध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि बऱ्याच चित्रपटात अभिनय केला. ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘रन’, ‘दस कहानिया’, ‘दबंग’ हे चित्रपट महेश मांजरेकर यांच्या हिट चित्रपटांपैकी आहेत. याशिवाय त्यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.