महिलेस चाकूचा धाक दाखवून 200 रुपयाची मागणी

0
एकाविरुद्ध गुन्हा दाखल
 *भुसावळ (प्रतिनिधी )*-
 येथील पंचशील नगर,मच्छी मार्केट मागील भागातील महिलेस चाकुचा धाक दाखवून पैशाची  मागणी करणाऱ्या विरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
 पंचशील नगर भागातील रहिवासी महिला  सायराबी शेख युसुफ या  10 जानेवारी 2020 रोजी 11वाजेच्या सुमारास
दिनदयाल नगर भागातील घरी जात असतांना संशयित आरोपी कलीम शेख सलीम याने दिनदयाल नगर भागात मशिदीच्या पाठीमागील गल्लीत सार्व जागी रोडवर  अडवून शिवीगाळ करुन  पोटाला चाकु लावुन धमकावीत 200 रुपयाची मागणी केली व धमकी दिली महिलेस लाथा बुक्याने मारहाण केली. त्यावेळा रामकलीबाई परदेशी,लता अशोक ठाकरे, निर्मला प्रशांत जाधव अशांनी कलीम शेख सलीम यांच्या तावडीतून सोडविले .अशी तक्रार दिल्यावरुन  बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भाग -5 गु.र.न.16/2020 भा.द.वि.कलम 387,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ.जयराम खोडपे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.