पोलीस स्थापना दिनानिमित्त वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी चे यश

0

धर्माबाद ।  धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्थापना दिन  रायझिंग डे च्या निमित्ताने धर्माबाद शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासा साठी धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व सहायक पोलिस निरीक्षक अनिल संनगले यांच्या संकल्पनेतून धर्माबाद तालुक्यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक व कलात्मक गुणांच्या वाढीसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.

हुतात्मा पानसरे विघालय  येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .त्यामध्ये वकृत्व स्पर्धेमध्ये कुमारी कृतिका शिवराज गाडीवान  हिने पहिला तर ईप्‍तेकर मनिषा  दुसरा आणि नरवाडे दिपालीने तिसरा क्रमांक पटकावला तर निबंध स्पर्धेमध्ये  पहिला ढवळे सावली द्‍वितिय रितेश चव्‍हाण ,तर मोनिका गंठोडने तृतिय क्रमांक पटकावला .

विजेत्या विद्यार्थ्यांना धर्माबाद पोलीस स्टेशन येथे सन्मानाने बोलावून बक्षीस वितरणाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

पोलिस ठाण्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यशैली विषयी माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संनगले पोलीस कॉन्स्टेबल अनेराये, स्वामी, पानसरे शाळेचे श्री पडोळे सर ,श्री भुसल वाड सर, विस्डम इंग्लिश स्कूलचे हौसाजी जाधव, जिजामाता शाळेच्या शिक्षकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.