महिला पोलिसाची बदनामी करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील आपल्या सहकारी महिलेबद्दल इतरांना अश्‍लील मॅसेज पाठविण्याच्या आरोपातून पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या नावाने इतरांना अश्‍लील मॅसेज पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत एका महिला तक्रारदाराच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याविषयी  सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे व सहकार्‍यांनी याची कसून चौकशी केली. सदर  गुन्ह्याच्या तपासात मोबाइल क्रमांकाच्या माहितीवरून व प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजच्या विश्लेषणावरून हा गुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात काम करणारा पोहेकॉ नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे नरेंद्र वाारुळे हा सायबर विषयातील तज्ज्ञ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.