महिला नगराध्यक्षांच्या काळात महिलांचीच कुचंबणा

0
सुनिल बोदडे
बोदवड – शहराला महिला नगराध्यक्षा लाभूनही त्यांच्या कार्यकाळात महिलांचीचं कुचंबणा होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
बोदवड शहर हे ५२ खेड्यांचे तालुक्याचे ठिकाण आहे.त्यामुळे येथे तालुक्यातील नागरिक दररोज विविध कामानिमित्त तसेच बाजारहाटासाठी,यांसह पंचायत समिती,कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,तहसिल कार्यालयात शासकीय कामानिमित्त कायम येत असतात.त्यात महिलांचा लक्षणीय समावेश असतो.मात्र शहरात महिलांसाठी कोणतीही सुविधा नाही.त्यांना साधी लघुशंकेला जाण्याची सुध्दा सुविधा नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात कुंचबणा होत आहे.
बोदवड शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे कुठेही प्रसाधनगृह अथवा स्वच्छतागृह नसल्याने वास्तव आहे.महिला नगराध्यक्ष असुनही त्यांच्या कार्यकाळात याबाबींकडे गेल्या ३ वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे.
बोदवड तालुक्याची ओळख देशाच्या प्रथम महिला महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे माहेरघर म्हणून आहे.त्याचंबरोबर येथील पंचायत समितीवर सभापतीपद म्हणून अनेक महिलांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.आजरोजही पंचायत समितीच्या उपसभापती तसेच सदस्या म्हणून महिला विराजमान आहेत.तसेच तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणुन महिला आहेत.
बोदवड नगर पंचायतीची स्थापना होऊन जेमतेम ३ वर्षे पूर्ण झाली असून नगरपंचायतीने या कालावधीत शहरात एकही प्रसाधनगृह व स्वच्छालयाची निर्मिती केली नाही.उलट शहरात असलेली जुन्या स्वच्छतागृहे व प्रसाधन गृह यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे तर बहुतेक पुरुष प्रसाधन गृहात घाणीचे साम्राज्य आहे.
महिला प्रसाधन गृहाबाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरात कुठेही महिलांसाठी प्रसाधनगृह नसल्याने लघुशंकेसाठी कुठे यावे?असा प्रश्न कायम महिलांना पडतो.त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुंचबणा होत आहे.परिमाणी पुरुषांसह महिलांना उघडल्यावर लघुशंकेला जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काही आंबटशौकीन याचा फायदा घेत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात,गांधी चौक,तहसिल व पंचायत समिती आवारात,जामठी रोडवरील बाजारपेठ परिसरात, बसस्थानकात परिसरात तात्काळ महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रसाधन गृह व स्वच्छतागृह बांधणे अत्यंत गरजेचे आहे.
बोदवड शहराच्या १७ सदस्यीय नगर पंचायतीत महिला नगराध्यक्षा व ८ नगरसेविका महिला असतानाही शहरात महिलांसाठी कुठल्याही सुख सुविधा नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.