लूटमार करणारा फरार आरोपी पोलिसांच्या जाळयात

0
भुसावळ (प्रतिनिधी )- नाहाटा महाविद्यालयानजिक असलेल्या पाण्याच्या टाकिमागे चाकुचा वार करून एकास लुटल्या प्रकरणी दाखल गुन्हयातील फरार आरोपीस बाजारपेठ  पोलिसांनी जेरबंद केले आहे .
     नाहाटा महाविद्यालया नजिक असलेल्या पाण्याच्या टाकिमागे दि.11.1.2020 रोजी 4 :30 वाजेचे सुमारास  फिर्यादी  सुनिल बाजीराव कोळी वय – 35  रा.तळवेल ता.भुसावळ हे मोटर सायकल  लावुन लघुशंकेला  गेले असता आरोपी अजय डिगंबर जाधव वय -24 रा.खालची पेठ भडगाव ता.पाचोरा ह.मु.दिनदयाल नगर भुसावळ याने तिथ येवुन फिर्यादी चाकु लावुन शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली व जबरदस्तीने त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशातुन 3200/- रु.काढुन घेतले तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीस प्रतिकार केला असता तेव्हा आरोपी याने त्याच्या जवळ असलेल्या चाकुने फिर्यादीवर वार करून जखमी केले  रक्तसत्राव  पाहुन आरोपी तेथुन फरार झाला होता.त्याचेविरुद्ध  बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न 19/2020 भा.द.वि कलम.397,504.506 या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा पासुन आरोपी फरार  होता
दि.21.1.2020 रोजी 9.30 वाजता  सुमारास  शहरात नाहाटा चौफुली जवळी पाण्याच्या टाकी जवळ आरोपी  अजय डिगंबर जाधव  हा आला असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरुन पोलीसअधिक्षक पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड
पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निअनिल मोरे,  पो.ना महेश चौधरी पो.कॉ.उमाकांत पाटील,तुषार पाटील,कृष्णा देशमुख,प्रशांत परदेशी यांनी त्वरित आरोपीस  ताब्यात घेतले असून  बाजार पेठ पोलीस स्टेशनला कारवाई केली
    सदर गुन्हयाचा तपास सहायक्क पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत . आरोपी हा भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून  भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न 39/ 2018 भा.द.वी कलम.397,504,34 भाग 5 गु.र.न 136/ 2019 भा.द.वि कलम392,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.