महिला दिनानिमित्त रात्री ११ वाजेला काढली भव्य महिला सुरक्षा रॅली

0

जळगाव :- जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला असोसिएशन, भूमाता ब्रिगेड, भूमाता फाउंडेशनतर्फे गुरुवारी रात्री ११ वाजता काव्यरत्नावली चौकात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्त्रियांचे स्त्रियांसाठीचे सामाजिक भान या विषयावर टोक शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमित्रा शंकपाळ यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, डॉ. देवानंद सांखला व डॉ. विशाखा गर्भे यांचा योगिता सपकाळे व कृष्णा सावळी यांनी गौरव केला. त्यानंतर रात्री ११ वाजता भव्य महिला सुरक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी मशाल पेटवून रॅलीची सुरुवात केली. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलानजीक रात्री १२.१५ ला झाला.

यांची होती उपस्थिती
विद्या वर्मा, मीरा जोशी, भारती पाथरकर, मंगला नगरकर, प्रशांत देसाई, मनीष टिळेकर, विक्रांत पवार, विनोद तेलगे, स्वाती वाट्यवार, राजकुमार पाटील, राजेश मारवाडी, नम्रता राजपूत, वनिता शर्मा, मीनाक्षी शिंदे उपस्थिती होते.

या मंडळांचे लाभले सहकार्य
अतिहंत मार्गी जैन महिला मंडळ, उन्नती राजपूत प्रतिष्ठान महिला मंडळ, परदेश धोबी समाज महिला मंडळ, जैन महिला मंडळ, वनिता विश्व महिला मंडळ, लोहाना गुजराथी महिला मंडळ, मैढ क्षत्रिय सोनार महिला मंडळ, जागृती महिला मंडळाचे सहकार्य लाभले,

यांचा झाला गौरव
महापौर सीमा भोळे, राजकुमार पाटील, अनंत सांगळे, प्रा. शालिग्राम पाटील, माधुरी टोपणे, नितीन विसपुते, भरती पाथरकर, माईसाहेब पाटील, वासंती दिघे या कर्तबगारांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला .

Leave A Reply

Your email address will not be published.