3 हजाराची लाच स्विकारताना महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला अटक

0

जळगाव | प्रतिनिधी
नवीन विद्युत मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात 3 हजाराची लाच स्विकारताना महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला गुरूवारी लाचलूचपत विभागाच्या पथकाकडून रंगेहात अटक करण्यात आली.
जळगावातील एका तक्रादाराला घरी विद्युत मीटर बसवायचे असल्याने त्यांनी अर्ज दिला होता. नवीन मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात आज दि. ७ त्यांच्याकडे महावितरणचे वरीष्ठ तंत्रज्ञ (सिनीयर टेक्नीशियन) मयुर अशोक बिर्‍हाडे वय-31 यांनी 3 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यावरून उपअधीक्षक जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, कर्मचारी मनोज जोशी,  प्रविण पाटील, अरूण पाटील, नासीर देशमुख, शामकांत पाटील, प्रशांत ठाकूर, ईश्वर धनगर यांनी  गुरूवारी दुपारी मयुर बिर्‍हाडे याला लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

Leave A Reply

Your email address will not be published.