ऐनपूर महाविद्यालयात व्हीव्हीपॅट मशिन कार्यशाळा

0

निर्भयपणे मतदानाचा अधिकार गाजवा : उषाराणी देवगुणे
ऐनपूर | प्रतिनिधी
ऐनपूर येथिल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडल संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात रावेर तहसिल कार्यालया मार्फत मतदान जन जागृती अभियाना अंतर्गत कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले. कार्यशाळेत रावेर तालुक्याच्या तहसिलदार ऊषाराणी देवगुणे यांनी व्हीव्हीपॅट मशिन विषयी माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना प्रात्याकक्षित करून दाखविले. आय टी आय चे शिक्षक श्री भालेराव यांनी मशिन कश्या पध्दतीने कार्य करते त्याची माहीती दिली कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी आपल्या मनोगतात निर्भय पणे मतदान करा आपले मत आपल्या पसंतीच्या उमेदवारासच जाणार आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन विषयी शंका घेण्याचे कारण नाही असे सांगितले.
कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करा.असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा साईनाथ उमरीवाड यांनी केले आभार डॉ सतिष वैष्णव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी मेहनत घेतली यावेळी डॉ के जी कोल्हे, डॉ पी आर महाजन डॉ निता वाणी,प्रा बारी,प्रा इंगले प्रा रुपाली बर्हाटे ,प्रा मोहीनी भंगाळे प्रा हर्षा महाजन प्रा डॉ गवली,प्रा सोनवने, डॉ रेखा पाटील, प्रा रामटेके,प्रा हिरोले, प्रा नेहेते ,डॉ सतिष पाटील ,प्रा व्ही एच पाटील ,प्रा महाजन,डॉ भोळे,डॉ डी बी पाटील व सर्व प्राध्यापक,विद्यार्थ्यि ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला ‘कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले. त्यांना ऐनपूर गावाचे तलाठी विजय शिरसाट रावेर कार्यालयाचे कर्मचारी सोनार वईतर याचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.