महाराजानी स्व:ताचा विचार न करता रयतेचा विचार केला

0

पारोळा येथे शिवजयंती निमित्ताने व्याख्यान

पारोळा–प्रतिनिधी

स्वत:चा विचार न करता शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला.आईवडीलांच्या संस्कार व शिकवणीचे बाळकडु घेत उद्योगशीलतेने स्वराज्यासाठी धडपड केली.यासाठी युवकांनी मोबाईलचा वापर टाळुन शिवाजी महाराजांची उद्योजकता आत्मसात करावी,तसेच कौटुंबिक जीवनात आई वडीलांची सेवा करावी.हीच खरी शिवजयंती ठरेल असे आवाहन पुणे येथील शिवाजी महाराजांचे वंशज,इतिहासकार प्रा.नामदेवराव जाधव यांनी केले.

ओतार गल्ली येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवराय व आजचा तरुण या व्याख्खान प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ.चिमणराव पाटील,मनोराज पाटील,डाँ शांताराम पाटील,डाँ सुरेश पाटील,नगरसेवक नितीन सेानार,नगरसेवक मनिष पाटील,नगरसेवक पी.जी.पाटील,डाँ शांताराम पाटील,प्रा.आर बी पाटील,अँड तुषार पाटील,डाँ पी के पाटील,प्रा बी एन पाटील,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील,छावा तालुकाध्यक्ष विजय पाटील,प्रा.एस एल मकासरे,उद्योजक सुधाकर पाटील,छोटु हिरामण पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

प्रा.जाधव म्हणाले कि,आजची तरुण पिढी भरकटली आहे.उच्च शिक्षित युवकामची नोकरीच करेल उद्योग करणार नाही अशी मानसिकता आहे.लहानपणी टि.व्ही तर मोठेपणी मोबाईल अशी अवस्था झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.शिवाजी महाराज हे सामान्य रयतेसाठी जगले,त्यांनी  विश्वात्मक कल्याणासाठी आई वडीलांचे मार्गदर्शन घेतले.त्यामुळे आता आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे.आईवडीलांनी लहानपणीच विद्यार्थ्यांना दिशा दिली तर नक्कीच तो मोठेपणी यशाची उंची गाठतो.यासाठी सर्वांनी आज शिवजयंती दिनी  संकल्प करुन जीवनात बदल घडु असे सांगीत शिवाजी महाराजांची 111 देशात शिवजयंती साजरी केली जात असल्याचा अभिमान व्यक्त केला.

शिवाजी महाराजांना  अपेक्षित समाज घडविण्याची गरज – आ.चिमणराव पाटील

चारशे वर्षापुर्वी शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना करुन  समाजाची सेवा केली.समाज उभारणीसाठी त्याकाळी अनेकांनी योगदान दिले.याचे आत्मपरिक्षण करुन शिवाजी महाराजांना अपेक्षित समाज घडविण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्रितपणे  समाज उभारणीसाठी पुढे येण्याची गरज आहे.समाजात मत व मन बदल जात असुन शिवाजी महाराजांना अपेक्षित समाज घडविण्याची   खर्या गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास शहरातील शहरातील युवक – युवती महीला व पुरुष मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भुपेंद्र पाटील यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

शेवटी राष्टगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.