आशा गतप्रवर्तक यांचा चोपडा येथे २७ फेब्रुवारीस मोर्चा

0

चोपडा ...तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक आशा व ग्रह यांच्या चोपडा तहसीलदार कार्यालयावर दिनांक२७/२/ २०२७रोजी गुरुवारी सकाळी ११वाजता आयटक कार्यालय बस स्थानक समोर चोपडा येथून मोर्चा काढण्यात येणार आहे ..मागण्या अशा ..आशा कर्मचाऱ्यांना 16 सप्टेंबर 2020 रोजी दिलेले आश्वासन प्रमाणे त्यांचे मानधन दुप्पट करण्यात यावे व फरक मिळावा

तसेच गटप्रवर्तक यांच्या मानधनात पंचवीस शे रुपये वाढ देण्याचे आश्वासन पाळावे आणि केंद्रीय कामगार संघटना फेडे रेशन चे  निर्णय प्रमाणे आशा गटप्रवर्तक यांना एकवीस हजार रुपये वेतन व दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी थकीत  मोबदला देण्यात यावा.. आदी मागण्या तहसीलदारांना सादर करण्यात येतील तरी तालुक्यातील आशा गटप्रवर्तक स्त्री परिचर व आरोग्य खात्यातील कंत्राटी नोकर यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे  आवाहन  अमृत महाजन, कल्पना महाले, सुरेखा महाजन, वंदना सोनार, वंदना पाटील,  मीनाक्षी सोनवणे ,मनीषा पाटील रेखा पाटील भारती माळी, रंजना धनगर शालिनी शालिनी पाटील मोरे प्रतिभा सनेर विद्या सनेर ज्योती पाटील शीतल कोळी आदींनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.