मराठा व्यवसाय संघाची बैठक

0

पाचोरा – दि . 31
पाचोरा येथील राजीव गांधी टाऊन हॉल येथे मराठा व्यवसाय संघाची बैठक संपन्न झाली.समाजातील सर्व स्तरातील उद्योजक व्यवसायिक, दुकानदार, डॉक्टर, वकील, पत्रकार, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, कारखानदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ही स्वराज्यप्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा पूजन तसेच जिजाऊ वंदना म्हणत करण्यात आली.
सर्वांना मराठा व्यवसाय संघाचे ध्येय उद्दिष्ट विचारधारा ही तेजस पाटील यांनी प्रास्ताविक स्वरूपात समजवून सांगितली. उपस्थित प्रत्येक व्यवसायिक यांनी स्वतःची ओळख करून दिली व आपले व्हिजिटिंग कार्ड सर्वांना अदान प्रदान करण्यात आले.
यशस्वी उद्योजक सुशील समूहाचे रूपेश शिंदे, शीतल अकादमी तथा टायगर प्ले स्कुल चे रोहन पाटील, मजूर फेडरेशन संचालक प्रकाश एकनाथ पाटील, आर. अ‍ॅड. जी अपियरल्सचे गोपाळ गावांदे यांनी व्यवसायिकांना व भावी उद्योजकांना आपले अनुभव सांगितले. तसेच मार्गदर्शन केले. याच बरोबर रणजित पाटील,समाधान मुळे, किशोर नरेराव, अनिल नागणे, प्रवीण पाटील,भूषण देशमुख,जितेंद्र देवरे, निलेश सूर्यवंशी,अनिल पाटील, सतीश पाटील,दीपक पाटील, मंगेश पाटील,साहेबराव पाटील,सचिन सोमवंशी,गणेश पाटील, मुकेश तुपे, जीभाऊ पाटील,सुनील पाटील, मयूर पाटील,योगेश पाटील,किरण पाटील व इतर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्वांनाच आपला स्वतःचा परिचय व स्वतःची जाहिरात करायला लावल्याने तालुक्यातील या पहिल्यांदाच घेतलेल्या बैठकीचे व संकल्पनेचे कौतुक केले जात आहे. लवकरच एक तालुका समिती गठीत करून प्रत्येक महिन्याचा शेवटच्या रविवारी नियमित मिटिंग घेण्याचा निश्चय करण्यात आला. कार्यक्रम यशस्विते साठी आयोजनात रणजित पाटील, किशोर नरेराव,समाधान मुले,अनिल नागणे, मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले तर तेजस पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी राबविण्यात आला. जिजाऊ वंदना गजमल पाटील, सूत्रसंचालन तेजस पाटील तर आभार मंगेश पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.