गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिक्षकसेना 2019 च्या शैक्षणिक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा

0

पाचोरा – 31
डिसेंबर 2018 सोमवार रोजी पाळधी येथे नुतन वर्ष 2019 च्या शिक्षकसेनेच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जि.जळगांव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा , आश्रमशाळांना शैक्षणिक दिनदर्शीकेचे मोफत वितरण करीत असते. याप्रसंगी जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर सपकाळे, सरचिटणीस राधेशाम पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नाना पाटील, वासुदेव चौधरी, निवृत्ती बावीस्कर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप पवार, जळगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, धरणगाव तालुका अध्यक्ष रमेश बोरसे, एरंडोल तालुका अध्यक्ष सचिन सरकटे, पारोळा तालुका अध्यक्ष अनिल चौधरी तसेच सर्व तालूक्यांतून आलेले शिक्षक सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या क्यु.आर. कोडसह असलेल्या या दिनदर्शिकेचा दैनंदिन अध्ययन- अध्यापनासाठी प्रभावी उपयोग होईल असे सांगून या उपक्रमाचे कौतूक केले.
याप्रसंगी शिक्षकसेनेच्या पदाधिकार्‍यांनी खालील विविध समस्या गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडल्या. पदोन्नती लवकरात लवकर करण्यात याव्यात, तिसरे अपत्य असणार्‍या शिक्षकांना जि.प. कडून बडतर्फ का करू नये, अशा नोटीस मिळाल्या आहेत. याविषयी प्रलंबीत मेडीकल बील प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावेत, जिल्ह्यातील शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्यांना कायम करावेत, 23आक्टोबर 2017 चा जी.आर.यांनी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि वरील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यास सांगितले. लवकरच रोस्टरमधील त्रूटी पूर्ण करून पदोन्नती करण्यात येतील. असे शिक्षणाधिकारी यांनी श्री. पाटील यांना सांगितले. लवकरच मा.मुख्य कार्यकारी अधिकारीसो. जि.प.जळगांव यांच्यासोबत वरील प्रलंबित विषयांसंदर्भात शिक्षकसेना पदाधिकार्‍यांची मिटींग घेण्यात येईल. असे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.