प्रेरणा दर्पण फाऊंडेशन तर्फे मान्यवरांना 10 रोजी पुरस्कारांचे वितरण

0

चोपडा दि . 31
येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्यावतीने आयोजित दर्पण पुरस्कार 2019 सोहळ्यासाठी दि 10 जानेवारी रोजी मराठी हिंदी सिनेअभिनेता सचिन खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, दि 10 जानेवारी रोजी संध्या 6 वाजता येथील आनंदराज लॉन्सवर प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्यावतीने आयोजित दर्पण पुरस्कार 2019 सोहळयासाठी मराठी – हिंदी सिनेअभिनेता सचिन खेडेकर यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा दर्पण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गृहनिर्माण मंत्री सुरेशदादा जैन, तर प्रमुखपाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार डॉ.सुरेश जी.पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.मनिषाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 25 व्यक्तींना हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो यात विनोद भिला पाटील (उपक्रमशील शिक्षक ,बोरअजटी), सुरेश मगन बडगुजर ( श्रमसाफल्य ,चोपडा), संजू आधार वाडे (युवा राजकारणी,नवी मुबंई), प्रल्हाद बळीराम पाटील ( सामान्य व्यक्ति ते उद्योजक ,चोपडा), केशव शामराव पातोंड ( उत्कृष्ट प्रशासकीय सेवा , पाचोरा ) डॉ. भूषण अ. मगर (आरोग्यदूत, पाचोरा), मकरंद के.सपकाळे ( दिग्दर्शन, मुबंई), नरेंद्र भवरलाल जैन (युवा समाजसेवक, शहादा/खेतिया), प्रकाश भीमराव बाविस्कर ( प्रेरणादायी उद्योजक, मुबंई), सौ रेखाताई शांतीलाल बोथरा ( सहकारक्षेत्र, चोपडा), डॉ.नरेंद्र मगनलाल शिरसाट ( जेष्ठ धन्वंतरीं, चोपडा), पवन प्रकाश जैन ( युवा उद्योजक, / सामाजिक कार्यकर्ते, जळगाव), नरेंद्र वसंतराव पाटील ( शेती, उदयोग चोपडा), आधार बहुउद्दशीय संस्था, सौ भारती पाटील,सौ रेणू प्रसाद, ( सामाजिक कार्य , अमळनेर) , भागवत काशिनाथ महाजन (कृषी मित्र, गोरगावले) , डॉ संजय देवसिंग जाधव ( वैदयकीय, चोपडा), महेश कन्हैयालाल जैन ( व्यावसायिक, चोपडा), डॉ जे.डी. चव्हाण ( प्रयोगशील शेती/ वैद्यकीय वेले ता चोपडा ), ज्ञानेश्वर रायसिंग भादले ( शैक्षणिक सत्रासेन ) , विक्रम रमेश मुणोत (युवा उद्योजक जळगाव), रमनलाल रंगलाल जैन (सामाजिक कार्यकर्ते, मुक्ताईनगर ), दिलीप फुलचंद जैन ( पत्रकार, पाचोरा), तिलकचंद मूलजी शहा ( जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चोपडा), विजय वसंतराव विसपुते ( व्यावसायिक, अडावद), संदीप सुधिर धनगर ( उत्कृष्ट पोलीस कर्मचारी चोपडा), रिखबचंद सोभागचंद लोढा (जिवन गौरव, पहुर ता जामनेर) ह्यांना पुरस्कार दिले जाणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बारी, हिरेंद्र साळी, चेतन टाटीया, ऍड.अशोक जैन, आकाश जैन विश्वास वाडे, निलेश जाधव , सौ लता जाधव, हे मेहनत घेणार आहे वरील कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शाम जाधव, उपाध्यक्ष डॉ निर्मलकुमार टाटीया, सचिव लतीश जैन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.