विद्यार्थ्यानी समाजपयोगी कार्यात सहभागी व्हावे – प्राचार्य डॉ . फालक

0

भोळे महाविद्यालयाचे रासेयो शिबीर संपन्न

भुसावळ दि . 31
विद्यार्थ्यानी शिबीर काळात केलेल्याअ श्रमदान कार्याबाबत समाधान व्यक्त करून विद्याथ्यानी समाजकार्यात सहभागी व्यावे असे आवाहन करीत समाजपयोगी कार्यात सहभाग घेन्यायाचा भावी जीवनात कसा फायदा होतो हे विविध उदाहरणे डाऊन स्पष्ट केले . . येथील दादासाहेब भोळे महाविद्यलयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर तालुक्यातील सरकारी येथे जनता हायस्कुल येथे दिनांक 25 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान संपन्न झाले . शिबीराचे समारोपीय समारंभात प्राचार्य फालक बोलत होते .अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर पी फालक हे होते . यावेळी व्यासपीठावर साकरी सरपंच सौ कांचन भोळे , मुख्याध्यापक अनिल गुरुचळ , यांचेसह मान्यवर उपस्थित होते .
शिबिरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , निरामय जीवनासाठीच्या पद्धती , जाती युक्त भारत , देहदान , नेत्रदान आणि जादूटोणा विरोधी कायदा तसेच सामाजिक आरोग्य आणि विज्ञान या विषयांवर विविध तज्ञ आणि अनुभवी साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले . राज्यस्तरीय शिबीर आव्हान मध्ये प्रशिक्षित शिबिरार्थी व विद्यार्थ्यानी स्वयंसेवकांना आप्पती व्यवस्थापना मधील विविध बाबींची माहिती देऊन प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले तसेच महिलांमध्ये जनजागृती साठी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते . या मेळाव्यास सौ आरती चौधरी यांनी कचरा व्यव्यस्थापन आणि शौचालय निर्मिती साठी जनजागृती केली . तर स्त्री रोग तज्ञ डॉ . दीप्ती चौधरी यांनी मासिक पाळी दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात माहिती दिली . शिबीर काळात स्वयंसेवकांनी जनता हायस्कुल साकरी परिसर , गायत्री मंदिर परिसर , आणि साकरी गावात स्वच्छतेचे कार्य श्रमदानाच्या माध्यमातून केले . तसेच रोज प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती केली . समारोप समारंभाचे प्रास्तविक प्रा . डॉ . आर एस सरोदे , यांनी केले तर आभार प्रा . डॉ .दयाधन राणे यांनी केले .शिबीर यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी मयूर महाजन , स्थानिक विद्यार्थी गिरीश राणे , निलेश गोरे , निलेश करांडे यांनी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.