मनूदेवी येथे डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

0

जळगाव- मनूदेवी येथे गेलेल्या तरुणाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी  1.30 ते 2 वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील तुकारामवाडी येथील युवक अशोक गोपाळ सोनवणे (36) हा काही मित्रांसोबत मनुदेवी येथे गेला होता. तेथे नदीपात्रातील डोहात पडून बुडून त्याचा मृत्यू ओढावला. तो केटरिंगचा व्यवसाय करत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी, भाऊ व मुलगा असा परिवार आहे. त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. यावेळी परिसरातील नागरिक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.