मोठी बहिण गेली : नितीन गडकरी

0

मुंबई – भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. स्वराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गडकरी आदी नेत्यांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रध्दाजंली वाहिली आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलंय की, ‘स्वराज यांचे अचानक जाणे हे संघटना, देश आणि कौटुंबिक नुकसान आहे. मला आठवते, माझी तब्येत खराब असताना त्या माझ्या घरी आल्या होत्या. मला नेहमीच त्यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले. तसेच प्रेम आणि माया केली आहे. त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ.’

Leave A Reply

Your email address will not be published.