मद्यधुंद बेशुद्ध पित्याजवळ असहाय्य बालिका आढळली

0

जळगाव- शहरातील आकीॅड हॉस्पिटलसमोरील गाडगेबाबा उद्यानाबाहेर मद्यप्राशन करुन बेशुद्ध पडलेल्या वडिलांजवळ असहाय्य बालिका मंगळवारी दुपारी आढळून आली. हे दृष्य पाहून अनेक नागरिक हेलावले बघ्यांची गर्दी जमली. अनेकांनी त्या मुलीस विचारणा केली. काहींनी तिला खाऊची पाकीटे घेवून दिली. मात्र आधीच घाबरलेल्या व धांदरलेल्या स्थितीत असलेली मुलगी काहीच बोलत नव्हती त्यामुळे तिच्याबाबत व तिच्या पित्याबाबत काहीच माहिती मिळू शकत नव्हती. बोलताना ती केवळ जालना किंवा जामनेरचा उल्लेख करत होती. बेशुद्ध पडलेल्या तिच्या बापालाही नागरिकांनी त्याच्या तोंडावर पाणी वगैरे टाकून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिमद्यसेवनाने त्याची शुद्ध हरपली असल्याने सर्व प्रयत्न फोल ठरत होते.

शेवटी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे अजित पाटील यांनी नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.  त्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जोपर्यंत तो तरुण शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नसल्याने दाखल करणारे पोलीस नागरिकही चिंतेत आहेत. सदर तरुणाने अंगात निळी जीन्स व चॉकलेटी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. किंचत दाढी वाढलेली असून हातावर प्रेमाचे प्रतिक व राधाबाई असे गोंदलेले आहे. कानात बाळी घातलेली आहे. मुलीने पिवळी पॅन्टी व गुलाबी शर्ट घातलेला आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. शासनाने संसार उदध्वस्त करी दारु स्पर्श न करु अशा कितीही जाहिराती केल्या तरी व्यसनी व्यक्ती जुमानत नसल्यानेे समाजाचे हे दुर्दैव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.