मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

गेल्या  काही दिवसांपासून राज ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.