मनपाच्या अग्निशमन विभागात लवकर चार नविन गाडया

0

जळगांव – प्रतिनिधी
स्थायी समीतीच्या सभेत अजेंडावर सहा विषय घेण्यात आले होते प्रशासनाकडून आलेले या सहाविषयांनी मंजुरी देण्यात आली .
यात प्रामुख्याने काल झालेल्या अग्नितांडवासंदर्भात भविष्यात अश्या घटनांना सामोरे जाता यावे या दृष्टीकोनातून मनपा प्रशासनाने अग्निशामन विभगात 4 नविन गाडया लवकरात लवकर खरेदी करणार असल्याचे स्थायी सभेत सांगितले यात 2 मोठया स्वरुपातील व 2 लहान गाडया असणार आहे. आताच्या परिस्थीतीत अग्निशमन विभागात 3 गाडया उपलब्ध आहेत.
खाविआचे नितीन बरडे यांनी आयत्या वेळेच्या विषयात, महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे केवळ 3 गाड्या असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या अग्निशमन विभागाच्या पथकात गाड्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आगामी 2 महिन्यांत गाड्या घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.
गाळयांची रक्कम इंडस बँकेत जमा होणार
आयत्या वेळेच्या विषयात नितीन बरडे यांनी गाळयांची जमा झालेली रक्कम इंडस या बॅकेत खाते उघडून त्यात ते जमा करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला याला सभेत मंजूरी मिळाली.
गाळा थकबाकी पोटी 1 लाखाचा धनादेश
नगसेवक नगरसेवक अजय पाटील यांनी त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळ्यांचे थकीत बीलाचा 1लाख रुपयाचा धनादेश सभागृहात प्रभारी आयुक्तांकडे सुपूर्द केला.
किरकोळ वसूली संदर्भात सांशकता
दरम्यान, नितीन बरडे व अनंत जोशी यांनी काही हॉकर्सकडून किरकोळ वसुली विभागाकडून अवाजवी पैसे घेतले जात असल्याची तक्रार केली. अनंत जोशी यांनी वसुली ज्या प्रमाणात करण्यात येत आहे त्याप्रमाणात भरणा होत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
महापालिकेच्या सेवेतून मजूर संजय साळुंखे यास बडतर्फे करण्यात आलेले असून त्याचा सेवा समाप्त करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावास भाजपाने विरोध दर्शवून प्रत्येक बडतर्फी प्रकरणांची विभागीय चौकशी करा अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.